मुंबई – भारतीय क्रिकेटर रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. दोघांमध्ये सोशल मीडियावर झालेलं भांडण सर्वांना परिचित आहे. परंतु तरीही उर्वशी भारतीय क्रिकेट सामन्यादरम्यान क्रिकेट स्टेडियममध्ये दिसल्याने पुन्हा एकदा दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रिषभचा सहकारी आणि मित्र शुबमन गिलने आता याबाबत भाष्य केलं आहे.
क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स यांच्या अफेअर्सची चर्चा नेहमीच जोरात होत असते. म्हणूनच रिषभ आणि उर्वशीमध्ये नेमकं काय सुरु आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशात शुबमन गिलने एका कार्यक्रमात केलेल्या खुलाशाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हीडीओमध्ये एका कार्यक्रमात शुबमन गिलला उर्वशी आणि रिषभच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना तो म्हणाला,उर्वशी स्वतःच काहीना काही करत असते आणि इतरांना तिच्यावर चिडण्याची संधी देत असते. या सगळ्याशी रिषभ पंतचा काही संबंध नाही त्याच्याकडून उर्वशीसाठी कोणत्याही भावना नाहीत”.
Shubhman Gill on Urvashi Rautela🤣 #RishabhPant #shubhmangill pic.twitter.com/7WVGneU5Vb
— Nii🪴☄️ (@11justmythought) November 19, 2022
या सगळ्याचा रिषभवर काही परिणाम जाणवतो का ? असा सवाल विचारला असता गिल म्हणतो, “या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नसल्यामुळे त्याला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही”. एका पंजाबी वाहिनीवरील मुलाखतीत रिषभने हा सगळा खुलासा केला ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.