मुंबई – ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांची लेक श्रुती हासन नेहमीच तिच्या फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आली नसून तिच्या लग्न आणि प्रेमाची जाहिर कबुलीमुळे चर्चेत आली आहे.
आजपर्यंत रिलेशनशिप स्टेटस लपवून ठेवणाऱ्या श्रुतीने अखेर तिच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे. बॉयफ्रेन्ड शांतनु हजारिकासोबतचं नातं तिने ऑफिशिअल केलं आहे.
शांतनुने एका मुलाखतीत श्रुती हासन आणि त्याच्या नात्याबाबत सांगितले की,’आम्हा दोघांचं लग्न झालंय. मात्र हे लग्न पारंपारिक लग्न नाही तर क्रिएटीव्ह लग्न आहे.असेही तो म्हणाला. सोशलवर सध्या शांतनुचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून युजर्ससुद्धा त्यांच्या प्रेमाच्या जाहीर कबुलीला कॉमेंट्स करत शुभेच्छा देत आहे.
शांतनुआधी श्रुती विदेशी अभिनेता मायकल कोर्सेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार अशाही बातम्या होत्या. पण अचानक दोघांचं ब्रेकअप झालं.