यवतमाळ – पुसद शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. विचित्र दुर्घनेमध्ये लहान बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला आहे. लहान भाऊ झोक्यात बसला असताना बहीण त्याला झोक्यात झुलवत होती. तेव्हा अचानक झोका देत असातना दोरी तुटली व सिमेंटचा खांब या चिमुकल्यांच्या अंगावर पडला. या घटनेत बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे.
प्राची, वय 9 व तेजस, वय 6 असे मृत्यू झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. या घटनेमुळे चिमुकल्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरीकही हळहळ व्यक्त करत आहेत.
तेजस पाळण्यात खेळत होता तेव्हा प्राजी त्याला झोके देत होती. या झोक्याची एक दोरी लोखंडी खांबला तर दुसरी दोरी सिमेंटच्या खांबला बांधलेली होती. दरम्यान सिमेंट खांब अचानक कोसळला व प्राचीच्या डोक्यावर आदळला त्यामुळे प्राचीचा जागीच मृत्यू झाला. तसेच पाळण्याची दोरी तुटल्यामुळे तेजसही दुर फेकल्या गेला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तेजसला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना त्याचाही मृत्यू झाला.