औंध तीर्थक्षेत्रामध्ये श्री भवानी पार्वती मातेची अनेक रूपे पाहावयास मिळतात, त्यातील एक रूप म्हणजे मोकळाई देवी! एकपत्नी एकवचनी प्रभू रामरायांची भवानी मातेने घेतलेली परीक्षा अन् यातूनच देवीचे हे रुप प्रकट झाल्याचे मानले जाते. प्रभू रामचंद्र सीतेच्या जंगलातून सीतेचा धावा करत शोध घेत होते. भवानी मातेने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले.
देवी सीतामातेचे रूप घेऊन प्रभू रामचंद्रांना अनेक वेळा समोर आली. परंतु, प्रभू रामरायांनी या भवानीमातेच्या रूपास ओळखून मातेस नतमस्तक होऊन मातेकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षेची जाणीव होऊन भवानी मातेस हात जोडून मोकळं कर आई अशी मागणी केली. मातेने प्रभू रामरायांनी आपले मूळ रूप दाखवून मोकळे केले. तेव्हापासून या ठिकाणी भवानी मातेचा अवतार मोकळाई देवी या नावाने निर्मिती झाली.
सातव्या शतकात रूपोरी महाराज गोपालपुरी महाराज मूळ शेगाव सातव्या शतकात भ्रमंती करत आलेले रूपपुरी महाराज यांना या ठिकाणी मोकळाई देवीचे शक्तीपीठ असल्याचा दृष्टांत झाला. त्याठिकाणी रूपपुरी महाराजांनी शीळ उभी करून अनेक वर्ष देवीची आराधना व तपस्या केली. सातव्या शतकातच त्यांनी संजीवनी समाधी घेतली.
त्यानंतर शंभूपुरींनी देवीचे मंदिर बांधले व महाराजांच्या समाधीस्थळी मठाची विस्तारित निर्मिती केली. अशाप्रकारे नावारूपाला आलेले मोकळाई देवी मंदिर आजही पाहावयास मिळत मंदिरामध्ये मोकळाई देवीची पाषाणातील कोरीव मूर्ती व मंदिराचे दगडी काम मंदिराच्या आतील दगडी खांब यात कलात्मक सुबत्ता दिसून येते.
मंदिराबाहेर दगडी कोरीव नंदीचे मंदिर दिसते व लहानशा दगडी दीपमाळही दिसून येतात. मंदिराशेजारी असणारे देवीचे तळे असून यात स्नान करून मोकळाई देवीचे दर्शन घेतल्यास देवी शारीरिक व्याधी तून मोकळे करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हजारो भाविकांना याची प्रचितीही येते. त्यामुळे औंधमध्ये येणाऱ्या पर्यटक व देवी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.
मंदिरात देवीच्या मूर्तीबरोबर जोतीबा व खरंसुंड सिद्धनाथ काळभैरवाचेही स्थान आहे. देवीच्या मंदिरासमोर नंदी आहे. मंदिरापाठीमागे मोरलतीर्थ छोट्या तीर्थकुंडांच्या रूपात आहे. नजीकच्या डोंगरावर श्रीनाथाचे मंदिर आहे. केदारविजय या प्राचिन ग्रंथातही देवांचे सैन्य औंधासूराबरोबरचे युद्धासाठी मोरलतीर्थी आल्याचा उल्लेख आहे.
मोराळा या क्षेत्राचा आणखी एका संदर्भाने उल्लेख होतो. औंधगावात प्राचिन जलसाठे (तळी) आहेत. त्यांची नावे मोराळे, नागाळे, पद्माळे, विशाळे अशी होती. त्यातील एक तळे मोराळा येथे मोराळे तळे ओळखले जाते. श्रीमोराळाई देवीची पूजा आमले-गुरव यांच्याकडे आहे. श्रीमोरळाई देवीची पूजा अर्चा व या मंदिराची सर्व प्रकारची व्यवस्था आमले गुरव यांच्यामार्फत केली जाते. या मंदिराची संपूर्ण मालकी मठाधिपती श्री. दिलीपपुरी महाराज, मुख्य विश्वस्त श्रीशंभूपुरी उर्फ विसपुरी मठ औंध यांच्याकडेच आहे तर देवीची पूजा यमाईदेवी पुजारी गुरव करतात.