ओझर – अष्टविनायाकांतील मुख्य स्थान असलेले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री विघ्नहर गणपती ओझरचे मंदिर तब्बल 18 महिन्यांनंतर गुरुवार (दि. 7) पासून भाविकांना दर्शनासाठी
पहाटे पाच वाजलेपासून उघडणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.
भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कोविडचे संकट अजून संपलेले नाही. त्यामुळे राज्यशासनाकडून जे नियम घालून दिलेले आहेत ते संपूर्णपणे पालन करूनच
भाविकांना दर्शन दिले जाईल. शासनाच्या नियमावलीची काटेकोर पणे अंमलबजावणी केली जाईल, असे देवसंस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.