मुंबई – अभिनेत्री ‘श्रेया धन्वंतरी’ तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते. तिने ‘फॅमिली मॅन’ आणि स्कॅम 1992′ यासारख्या गाजलेल्या वेबसिरिजमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.
पण सध्या तिने केलेले फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही अतिशय बोल्ड अंदाजातील फोटो पोस्ट केले असून, तिच्या मादक फिगर वरून लक्ष देखील हटवणे फॅन्सला अवघड झाले आहे.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये श्रेया निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. निळ्या रंगाच्या प्रिंटेड बिकिनीतील श्रेयाचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटो पाहून असे दिसते की अभिनेत्री आनंदी आहे आणि दर्जेदार वेळ घालवत आहे. तिने स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले आहेत.
तसेच, दुसऱ्या पोस्टमध्ये श्रेयाने बाथरूममधील काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे आणि तिने हातात ग्लासही घेतला आहे.
यावेळी अभिनेत्री कपड्यांशिवाय उन्हात आंघोळीचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचे हे बोल्ड लूकमधील फोटो सगळीकडे व्हायरल होत असून, यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.