Shreya Bugde : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) तिच्या विनोदाच्या खास टामिंगसाठी ओळखली जाते. आपल्या विनोदी शैलीने ती अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहते. श्रेया सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने पतीसोबतचे रोमॅंटिक डेटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रेया आणि तिचा पती निखिल यांनी लग्नाचा 10वा वाढदिवस साजरा केला आहे.
View this post on Instagram
अथांग समुद्रात यॉटमध्ये रोमँटिक डेटवर जात दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ओपन बोटमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला नवऱ्यानं श्रेयाला हे खास सरप्राइज दिलं आहे. श्रेयानं 27 डिसेंबर 2015 साली निखिल शेठबरोबर लग्न केलं. श्रेयाने पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही एका बोटमध्ये बसलेले दिसत आहे. यातील त्यांचा रोमॅंटिक अंदाज अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
दरम्यान, श्रेया अनेकदा इनस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे हटके आणि ग्लॅमरस लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडत असतात. श्रेया बुगडेला ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे एक वेगळी ओळख मिळाली.