मुंबई – चित्रपट निर्माते अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नु यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेले दोन दिवस छापे घातले. तथापी या छाप्यानंतर आज त्या दोघांनीहीं आपल्या नवीन चित्रपटाच्या शुटींगचे काम सुरू केले. आपली नैतिकता अजूनही उच्चच आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न यातून या दोघांनीही केल्याचे मानले जात आहे.
दोघांनीही सोशल मिडीयावर या चित्रिकरणाचे फोटो शेअर केले आहेत. तापसी पुन्नुनेही आपल्यावरील छाप्याच्या कारवाईविषयी तीन ट्विट संदेश प्रसारीत करून या कारवाईची खिल्लीच उडवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. त्यातील एका ट्विट मध्ये तिने मी आता इतकी स्वस्त राहिलेली नाही अशीही टिपण्णी केली आहे. या दोघांच्या दोबारा चित्रपटाचे शुटींग सध्या सुरू आहे.