मुंबई – ‘दृश्यम 2’ या चित्रपटामुळे अभिनेता अजय देवगण सतत चर्चेत असतो. या चित्रपटात अजयसोबत अभिनेत्री तब्बूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, ‘दृश्यम 2’ बद्दल नवीन बातमी समोर येत आहे. अजय देवगण आणि तब्बू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत घोषणा करताना ते म्हणाले की, यावर्षी 2 नोव्हेंबरला Drishyam2 रिलीज होणार आहे.
Attention! ⚠️#Drishyam 2 releasing in theatres on 18th November 2022
#Tabu #AkshayeKhanna @shriya1109 #RajatKapoor @ishidutta #MrunalJadhav @AbhishekPathakk #BhushanKumar #KrishanKumar @KumarMangat @Viacom18Studios @TSeries @PanoramaMovies #Drishyam2 pic.twitter.com/Ak1fa4gabp
— Ajay Devgn (@ajaydevgn) June 21, 2022
अजय देवगणने ही घोषणा करताना ट्विट केले की, ‘सावधान! #Drishyam2 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.’
अभिषेक पाठक दिग्दर्शित, अजय देवगणची बहुचर्चित व्यक्तिरेखा विजय साळगावकर या वर्षी आपल्याला आणखी एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाईल. थ्रिल, ड्रामा आणि अॅडव्हेंचर असलेला हा सिक्वेल विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा कल्पनेच्या पलीकडे नेईल. थ्रिलरमध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांचाही समावेश आहे. या चित्रपटाची टीम गेल्या काही दिवसांपासून शूटिंग करत असून आज हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.