कटिहार : प्रेम आंधळ असतं हे आपण नेहमीच ऐकतो. प्रेमात सोबत मृत्यू आला तरी त्याला सामोरी जाण्याचा आणाभाका प्रेमी जोडपे घेतात. मात्र बिहारमधून प्रेम माथेफिरू देखील असतं, याचा प्रत्येय बिहारमध्ये आला आहे. कटिहार येथे एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापले.
कटिहार येथील एक महिला रविवारी छठ पूजेसाठी गंगा स्नान करण्यासाठी गेली होती. गणेशपुर येथील प्रीतम कुमार तेथे पोहोचला आणि महिलेसोबत गैरवर्तणूक करू लागला. यानंतर त्याने महिलेला मारहाण केली आणि तिचं नाक आणि कान कापले. पौर्णिया नगर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.
या कृत्यानंतर प्रीतमला पश्चातपही झाला. ते रडत होता. प्रितम म्हणाला, मी प्रेयसीला देव मानतो. मात्र ही चूक कशी झाली माहीत नाही. पुढे तो म्हणाला की, त्याला काहीच सांगायचं नाही.
दरम्यान पीडितेने सांगितलं की, आरोपी तरुणाने पैसे घेतले होते. ते त्याला परत करायचे नव्हते. तो नेहमी पती आणि मुलांना मारण्याची धमकी देत असतो. रविवारी तो आला आणि मारहाण करू लागल्याचे पीडितेने म्हटलं.