नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाने कहर केला असून, आज तब्बल दोन हजार 414 रुग्ण आढळल्याने हा आकडा नगरकरांच्या मनात धडकी भरविणार आहे. ऑक्सिजन आणि बेड शिल्लक नसल्याने दररोज रुग्णांची धावपळ सुरू आहेत. त्यात दैनंदिन दोन हजारांनी रुग्ण वाढ होत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेसह खासगी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली.
दरम्यान, जिल्ह्यात आज 1617 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 1 हजार 907 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.82 टक्क्यांवर येऊन ठेपले आहे.सध्या जिल्ह्यात 12 हजार 858 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 902, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 412 आणि अँटिजेन चाचणीत 1100 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 358, अकोले 67, जामखेड 08, कर्जत 37, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 74, नेवासा 21, पारनेर 43, पाथर्डी 21, राहता 71, राहुरी 04, संगमनेर 37, शेवगाव 25, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 55, कँटोन्मेंट बोर्ड 39, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 92, अकोले 17, जामखेड 02, कर्जत 03, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 21, नेवासा 09, पारनेर 13, पाथर्डी 03, राहाता 132, राहुरी 17, संगमनेर 23, शेवगाव 01, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 31, कँटोन्मेंट बोर्ड 08 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 1140 जण बाधित आढळून आले. मनपा 81, अकोले 87, जामखेड 39, कर्जत 95, कोपरगाव 46, नगर ग्रामीण 103, नेवासा 35, पारनेर 81, पाथर्डी 35, राहाता 78, राहुरी 133, संगमनेर 10, शेवगाव 45, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 157, कॅन्टोन्मेंट बोर्ड 40 आणि अन्य जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:1,01,907
उपचार सुरू असलेले रूग्ण:12858
मृत्यू: 1282
एकूण रूग्ण संख्या:1,16,047
खासगी रुग्णालयांकडून लपवालपवी
खासगी रुग्णालयामध्ये बेडच्या स्थितीबाबत ऑनलाइन माहिती आपलोड करण्याची जबबादारी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनावर आहे. मात्र, त्यांच्याकडून वेळेत माहिती अपलोड होत नसल्याने शिल्लक बेडची माहिती प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनाही मिळत नाही. खासगी हॉस्पिटलकडून बेड माहिती लपविली जात आहे, असे बोलले जात आहे.