वाघोली (प्रतिनिधी) : केसनंद तालुका हवेली येथील अनिल दत्तात्रय जाधव यांची शिवसेनेच्या हवेली तालुका युवा सेना प्रमुखपदी निवड असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते त्यांना जाधव यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी केसनंद गावचे माजी सरपंच मिलिंद नाना हरगुडे,शिवसेना जिल्हा युवासेना प्रमुख गणेश बाळासाहेब सातव,शिवसेना तालुका प्रमुख विपुल शितोळे,माजी सरपंच,संतोष हरगुडे, सरपंच दत्ता आबा हरगुडे. ग्रा. पं .सदस्य प्रमोद हरगुडे ,शांताराम हरगुडे, सागर तांबे,कुमार ढोरे,अमित येवले, सचिन सावंत, विनायक ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जाधव यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहविण्यासाठी कार्य करणार असून युवा संघटना मजबूत करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
जाधव यांच्या निवडीबद्दल तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी सरपंच तानाजी हरगुडे, कुबेर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरगुडे आदींनी अभिनंदन केले आहे.