मेढा – जावळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 6 पैकी 5 ग्रामपंचायतीत आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचे थेट सरपंच झाले असून या निवडणुकीतही आ.भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जावली तालुक्यात 6 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये वागदरे गावातील सरपंच व तीन सदस्यांसाठी लागलेल्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात सरपंच पदावर वनिता राजेंद्र शेलार विजयी झाल्या आहेत. तर सचिन अर्जुन शेलार, शंकर तुकाराम शेलार, मनिषा शंकर शेलार यांची वर्णी लागली आहे. तर संपत तुकाराम शेलार, अलका राजेंद्र शेलार, नीलम दत्तात्रय शेलार, दर्शना सुनील चव्हाण हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
भामघर येथे झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या विजय सावले यांनी बाजी मारली आहे.तर विश्वास रामचंद्र शेलार, बापू कोंडीबा सावले, हितेश दिलीप सावले, नंदा शंकर सावले, कमल बबन पार्टे, अनिता विलास सावले, लिलाबाई बजरंग पाटणे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
बिभवीत झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा पराभव झाला असून या गावात सत्तांतर झाले आहे. यात समता ग्रामविकास आघाडी पॅनलचे संतोष बांदल हे सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत. तर कांताराम यदु शिंदे, स्वाती शरद देशमुख, आरती अमोल बांदल तर अजिंक्य ग्रामविकास आघाडी पॅनलचे सोमनाथ बाळकृष्ण जाधव हे सदस्य विजयी झाले आहेत. तर सागर दत्तात्रय परिहार, काजल सुहास परिहार व अनुसया मारुती जवळ हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सांगवी तर्फ मेढा ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांसाठी निवडणूक लागली होती. यात कमल गोरे, लक्ष्मी शिंदे या दोन उमेदवार विजयी झाल्या आहेत. सरपंच पदासाठी वनिता धोंडिबा गोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सदस्यपदासाठी तुकाराम झोरे, सुनंदा गोरे, शंकर जवळ किसन पार्टे, अर्चना पवार हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
कुरळोशी ग्रामपंचायतीत सरपंच पद व तीन सदस्य यांच्या साठी निवडणूक लागली होती. यात सरपंच पदी कल्पना सुरेश वाडकर या विजयी झाल्या आहेत. सदस्यपदासाठी संगीता बाळू कोळी, सुनील श्रीरंग चव्हाण, उषा विलास चव्हाण हे उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर सागर अशोक शिर्के, संतोष बाबुराव चव्हाण हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
==================