मुंबई – राज्यातील नेत्यांना आणि मंत्र्यांनाही करोनाचा संसर्ग होताना दिसून येत आहे. ठाकरे सरकारमधील 12 मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातले जवळपास 70 आमदार सध्या करोनाबाधित आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या परिवारातल्या चार सदस्यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला करोना संसर्ग झाला आहे. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर चार जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले.
या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.