लोणावळा, (प्रतिनिधी) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना शिंदे गट मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना शिंदे गट लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर व महिला आघाडी शहर संघटिका मनीषा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट पक्षप्रवेश केला.
शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये मनसे लोणावळा शहर सरचिटणीस निखिल सोमण, उबाठा युवासेना उपशहर अधिकारी विवेक भांगरे, उबाठा रेल्वे माजी प्रभागप्रमुख राजूभाऊ चव्हाण, उबाठा शाखाप्रमुख प्रमोद लोहिरे, उबाठा शाखाप्रमुख संतोष दरडे, मनसे शाखाप्रमुख परेश वावळे, माजी शाखाप्रमुख प्रसाद कन्नन, विवेक शिळवने,
आकाश खंडेलवाल, प्रमोद फाटे, आतिष भांगरे, दिलीप दुबे, चंद्रकांत भंडारी, सुनील निकम, राहुल कांबळे, अजय वाघमारे, ललित कदम, स्वप्नील गायकवाड, दिपाली शिरबेकर, आशा कदम आदी आजी माजी पदाधिकारी यांचा समावेश आहे. तर, पक्ष प्रवेशा वेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल हुलावळे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, युवासेना उपतालुका प्रमुख नितीन देशमुख, खंडू शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.