रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) – कारेगाव तालुका शिरूर येथील होम क्वारंटाईन केलेल्या १४ जणांचे स्वँब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व जणांचा स्वँबचा अहवाल हा निगेटिव्ह असल्याचे आरोग्य सेविका डाँ.एस.बी. राऊत यांनी सांगितले.
कारेगाव येथे कोरोना रोगाचा रुग्ण आढळल्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधान आले होते व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. माञ या क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत सहकार्य करावे व लाँकडाऊन चे पालन करावे असे आवाहन सरपंच अनिल नवले यांनी केले आहे.
तर १९ मे ते २३ मे या कालावधीत रांजणगाव गणपती गाव शंभर टक्के लाँकडाऊन करण्यात येणार असल्याचे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी सांगितले आहे. तसे परिपञक ही जाहिर करण्यात आले असल्याचे रांजणगावचे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी सांगितले.