छत्रपती शिवाजी महाराजांना केले विविध संघटनांनी अभिवादन
शिरूर – शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने, मनसे यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (तिथीनुसार) महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी सायंकाळी ढोल-ताशाच्या गजरात, हातात भगव्या झेंडे, “जय भवानी, जय शिवाजी’ जयघोषात, फटाक्याच्या आतषबाजीत शिवशाही मिरवणुकीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डेरे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग अण्णा थोरात यांच्यासह अन्य मान्यवरांनी शिवसेवा मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार विचार, त्यांची युद्ध नीती, जगातील पहिले आरमार आजही देशाला नव्हे तर जगाला प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर शहरातील शिवसेवा मंदिरासमोर झालेल्या या अभिवादनाच्या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक अभिजीत पाचर्णे, माजी शहरप्रमुख राजेंद्र परदेशी, राजेंद्र शिंदे, संतोष पवार, सुरेश गाडेकर, सुनील परदेशी, महेबूब सय्यद, अविनाश घोगरे, रवींद्र गुळादे, संदीप जामदार, आकाश खांडरे, गणेश लोखंडे, राजेंद्र देशमुख, सनी थोरात, अमोल गोरे ,भैरवनाथ पतसंस्थेचे नवनाथ पाबळे, पोपट ढवळे, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांसह मान्यवर उपस्थित होते. तर, सायंकाळी श्रीराम सेनेच्या वतीने शिरूर शहरातून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.