मुंबई – शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्तीस्वरूप दुर्गेची उपासना करतो. विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून देवीच्या उपासनेत लीन होतो. आपल्या प्रत्येकाच्या आत एक आत्मशक्ती असून, ती ओळखण्याचा हा कालखंड आहे.
दुर्गामातेला शक्तीचे आद्यपीठ मानले जाते आणि सर्व शक्तींचा स्रोतही. या शक्तीस्रोतामधून ऊर्जा ग्रहण करून स्वतःच्या अंतरंगात देवीचा अंश जागृत करणे हीच देवीची खरी उपासना आहे.
या उपासनेसाठी बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील नवरात्रीनिमित्त आपल्या घरे 9 कुमारीकांची पूजा केली. शिल्पाने आपला हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
व्हिडिओ मध्ये शिल्पाने आपली मुलगी समिशाला सुद्धा सुंदररित्या सजवलं आहे. छोट्या समिशाच्या पायालाही कुंकू लावून तिची पूजा केली आहे. तसंच इतर आठ कुमारींकांचीही यथायोग्य पूजा केलेली दिसत आहे.