जगातील सर्वात उंच इमारतीच्या यादीत दुबईतील बुर्ज खलिफाचा पहिला नंबर लागतो. जगातील श्रीमंत व्यक्तींना बुर्ज खलिफासारख्या इमारतीत आपलं घर असावं अशी इच्छा असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दुबईमध्ये भव्य आणि सुंदर दिसणाऱ्या इमारतीत स्वतःचे घर घेतले आहे.
या यादीत सुपरहॉट आणि आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या नावाचा समावेश झाला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वत: ला बुर्ज खलिफामध्ये एक सुंदर अपार्टमेंट गिफ्ट केले आहे.
शर्लिन चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची बातमी जाहीर केली. शर्लिनचं घर सर्व सुविधांसह अतिशय भव्य आणि सुंदर आहे. शर्लिन चोप्रा लवकरच मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे.शर्लिन चोप्रा लवकरच मनोरंजनाच्या उद्योगात स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे, ज्याची त्यांनी तैयारी भव्य स्तरावर चालू केली आहे.