नवी दिल्ली – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 2600 किलो हरिभंगा आंब्यांची भेट पाठवली आहे.
शेख हसिना यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनाही ही भेट पाठवली आहे. बांगलादेशातून पाठवले गेलेले हे आंबे दिल्लीत बांगलादेशच्या उच्चायुक्तालयामध्ये दाखल झाले असून परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवून देण्यात आले आहेत.
बांगलादेशामध्ये खूप गोड आणि चविष्ट आंबे पिकतात. त्याचा आनंद आमच्या शेजाऱ्यांनीही घ्यावा अशी आंची अपेक्षा असल्याचे बांगलादेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
मुजिब बोर्शोच्या ऐतिहासिक वर्षात आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सौहार्द म्हणून ही भेट आमच्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना पाठवण्यात आले असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.