हिंदी अभिनेता शर्मन जोशीचे मराठी नाट्यवर्तुळात पाऊल

रंग दे बसंती, स्टाईल, मेट्रो, थ्री इडियटस, ढोल, गोलमाल, फेरारिकी सवारी अशा अनेक हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ‘शर्मन जोशी’ आता मराठी नाट्यवर्तुळात प्रवेश करणार आहे. सुप्रसिद्ध नाट्यलेखक-दिग्दर्शक ‘केदार शिंदे’ एक नवीन मराठी नाटक घेऊन येत असून, त्याची निर्मिती शर्मन जोशी करणार आहे.

‘वाजले की बारा’ असं या नाटकाचं नाव असून, हे नाटक ‘द प्ले दॅट गोज राँग’ या गाजलेल्या नाटकाचे रिमेक असणार आहे. ‘द प्ले दॅट गोज राँग’ हे नाटक लंडन आणि अमेरिकेत प्रचंड गाजलेलं नाटक आहे.

यापूर्वी केदार शिंदे आणि शर्मन जोशी या जोडीने भारतामध्ये गुजराती आणि इंग्रजी भाषेत हे नाटक सादर करण्याची यशस्वी कामगिरी करून दाखवली होती. ‘वाजले की बारा’ हे नाटक जुलै-ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.