आसाराम बापूचा मुलगा ‘नारायण साई’ला बलात्कार प्रकरणी जन्मठेप

सुरत – साधिकेवर बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा ‘नारायण साई’ याला सुरत येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नारायण साईला एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये नारायण साई विरुद्ध तक्रार दाखल झाली होती. सुरतच्या जहांगीरपुरा या आश्रमातील साधिकेने नारायण साईवर बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधील पीपली येथून नारायण साईला अटक करण्यात आली होती. ज्यात आज न्यायालयाने नारायण साईला जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पोलिसांनी साधिकेचा जबाब आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर नारायण साईविरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान 53 जणांची साक्ष नोंदवण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.