मुंबई – छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदे’मध्ये धर्मगुरु कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते.
यावेळी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरताना गांधींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचं कौतुक केलं. दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्यावरून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी निराजी व्यक्त केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनीही या वादग्रस्त विधानावरून संताप व्यक्त केला आहे.
यानंतर, आता २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा कालीचरण यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आठ मिनिटे ५१ सेकंदांचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल दिलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
नेमकं काय म्हणाले कालीचरण पहा व्हिडियो