न्हावरे – शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अॅड.अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची उद्या (दि.११) सकाळी १० वाजता उरळी कांचन (ता. हवेली) येथील बाजार मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
यावेळी शरद पवार विविध मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दिली.
याप्रसंगी हवेली, शिरुर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सभेदरम्यान शरद पवार युवकांशी संपर्क साधणार आहेत.