बंगळुरू – बंगळुरूनंतर दिल्लीत आज एनडीएची ताकद दिसून येत आहे. एनडीएच्या बैठकीत 38 पक्ष सहभागी होऊ शकतात. चिराग पासवानही औपचारिकपणे एनडीएमध्ये सामील होणार आहेत. दुसरीकडे, भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी २६ विरोधी पक्षांच्या दोन दिवसीय बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. बैठकीनंतर सर्व नेते पत्रकार परिषदही घेणार आहे.
दरम्यान,अजित पवार गटातील 25-30 आमदारांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी आमदारांनी शरद पवार यांना मार्ग काढण्याची विनंती केली, त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘माझा नाही तर तुमचा मार्ग चुकला आहे. मग मी त्याबद्दल कोणत्या मार्गाने जाऊ? मी नेहमीच धर्मनिरपेक्ष राजकारण केले आहे आणि करेन. शरद पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.’
बंगळुरूमध्ये विरोधकांच्या बैठकीसाठी शरद पवार रवाना झाले आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा विमानतळाकडे रवाना झाले आहे.
एक दिवस आधी आज १७ जुलैला बेंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्षांच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी डिनर पार्टीला हजेरी लावली. विरोधी एकजुटीबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ‘आम्हाला भारतातील जनतेला हुकूमशाही, लोकविरोधी, द्वेष आणि लुटमारीच्या राजकारणातून मुक्त करायचे आहे.
त्याचवेळी भाजपचे सर्वेसर्वा जेपी नड्डा यांनीही विरोधकांच्या सभेवर हल्लाबोल केला.’ ते पुढे म्हणाले,’विरोधी आघाडी हे भानुमतीचे कुटुंब आहे. त्यांच्याकडे ना नेता आहे ना कोणते धोरण, ते भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे थवे आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीवर दिल्ली भाजपने ट्विट केले,’चोरों की बारात’ बेंगळुरूला पोहोचली, पण प्रश्न एक आहे – वधू कोण आहे?’ असा प्रश्न उपस्थित करत टीका केल आहे.