Malaysia Masters 2024 (Badminton) : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा सरळ गेममध्ये पराभव करत मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात दुसरी फेरी गाठली. ब्रेकमधून पुनरागमन करणाऱ्या सिंधूला पहिल्याच सामन्यात (Round of 32) गिलमोरचे कडवे आव्हान होते, मात्र तिने गिलमोरचा 21-17,21-16 असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत सध्या 15व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने या स्पर्धेच्या आधी झालेल्या उबेर कप आणि थायलंड ओपनमध्ये भाग घेतला नव्हता. माजी विश्वविजेती सिंधूने गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर अनेक जवळचे सामने गमावले आहेत. आता या स्पर्धेत चांगली कामगिरी करून पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला बळ देण्याचा तिचा मानस असेल.
पाचव्या मानांकित सिंधूने 2022 च्या सिंगापूर ओपनमध्ये अखेरचे विजेतेपद पटकावले होते. स्पर्धेतील तिचा पुढील सामना (Round of 16) गुरूवारी (दि.23 मे) कोरियाच्या ‘सिम यू जिन’शी होणार आहे.
Asian Relay Championships 2024 : भारतीय मिश्र रिले संघाचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णयश….
मिश्र दुहेरीत भारतीय जोडीची आगेकूच…
मिश्र दुहेरीत, जागतिक क्रमवारीत 53 व्या क्रमांकावर असलेल्या बी सुमीथ रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी यांनी पहिल्या सामन्यात (Round of 32) हाँगकाँगच्या क्वालिफायर लुई चुन वाई आणि फू ची यान यांचा 21-15, 12-21, 21-17 असा पराभव करून दुसरी (Round of 16) फेरी गाठली. आता त्यांचा सामना अव्वल मानांकित चेन तांग झी आणि मलेशियाच्या तोह ई वेई यांच्याशी होईल.