मुंबई- दिग्दर्शनाच्या पुर्वीच प्रचंड वादात सापडलेला चित्रपट लक्ष्मी नुकताच प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे. त्यानंतर अभिनेता अक्षक कुमारची नाही तर शरद केळकरच्या फोटोची किंवा भूमिकेची प्रचंड चर्चा होत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेता अक्षय कुमार akshay kumar याची मुख्य भूमिका असणारा Laxmii लक्ष्मी हा चित्रपट नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला.
चित्रपटात शरदची एक लहानशी भूमिका आहे. असं असलं तरीही खिलाडी कुमारपेक्षाही त्याच्याच भूमिकेला चाहत्यांनी उचलून धरलं आहे. आपण साकारलेल्या भूमिकेला मिळणारं चाहत्यांचं प्रेम आणि चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून शरदनंही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचेच मनापासून आभार मानले आहेत.