मुंबई – ‘पंजाबची कतरिना कैफ’ ते ‘इंडियाज शहनाज गिल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री शहनाज गिल सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, शहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल देखील वापरत असल्याचे समोर आले आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शहनाज गिल तिच्या कारच्या पुढील सीटवर बसलेली आहे. कारमध्ये बसून शहनाज तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर सलमान खानसोबतचे फोटो अपलोड करताना दिसत आहे. ती इंस्टाग्रामवर गेल्यावर तिथे दोन आयडी दिसतात. त्यानंतर शहनाज तिच्या प्रोफाईलवर क्लिक करते. इथेच ती फेक इंस्टाग्राम अकाऊंट वापरत असल्याचे लोकांना दिसत आहे.
शहनाज गिलला बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल वापरताना पाहून लोकांना खूप मजा येत आहे. एका यूजरने ‘दीदींचे फेक अकाऊंट पकडले’ अशी कमेंट केली आहे. शहनाजने इंस्टाग्रामवर सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘भाईजान 21 एप्रिल’.
दरम्यान, फरहाद सामजी दिग्दर्शित किसी का भाई किसी की जान 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान, शहनाज व्यतिरिक्त पूजा हेगडे, दग्गुबती व्यंकटेश, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी आणि जस्सी गिल यांच्यासह अनेक प्रसिद्ध स्टार्स आहेत.