shah rukh khan – 2023 हे वर्ष अभिनेता शाहरुख खानचे (shah rukh khan) वर्ष ठरले, ज्याचे संपूर्ण जग साक्षीदार आहे. प्रथम ‘पठाण’ व नंतर ‘जवाना’समवेत किंग खानने धुमाकूळ घातला आहे. आता चाहते त्याच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ (Dunki movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिनेमाच्या तारखेसह कथेकडेही लक्ष वेधले जात आहे. मात्र, हे डंकी चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आहे की नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
View this post on Instagram
पण पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाची पातळी वाढली आहे. ज्यामध्ये चित्रपटाची रिलीज डेट 22 डिसेंबर आहे. तसेच, पोस्टरमध्ये शाहरुख खानचा चेहरा दिसत नाही.
शाहरुखचा चित्रपट ‘डंकी’ आणि प्रभासचा चित्रपट ‘सालार’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. ‘डंकी’ आणि ‘सालार’ हे बॉक्स बीऑफिसवरील सर्वात मोठे क्लॅश आहे. परंतु आता शाहरुख खानच्या चित्रपटाची रिलीज देत बदलण्यात आली असून, 22 डिसेंबर करण्यात आली आहे.