पुणे – पीएनजी ज्वेलर्सने सोने व नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांमधील दोन नवीन कलेक्शन सादर करून ब्रॅंड ऍम्बेसिडर माधुरी दीक्षित-नेने यांच्या उपस्थितीत यंदाच्या दिवाळी मोहिमेचे अनावरण केले. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, या कलेक्शनमध्ये कुंदन, जडाऊ, हिरे व पारंपरिक सोन्यामध्ये तयार करण्यात आलेले हार, कानातले, अंगठी, ब्रेसलेट इत्यादी उत्कृष्ट दागिन्यांची विस्तृत श्रेणी पाहायला मिळणार आहे.
प्रत्येक डिझाईन ही उत्सवाचा काळ परिभाषित करणाऱ्या भावनांना प्रतिबिंबित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. दिवाळी सणाला परिभाषित करणाऱ्या विविध भावनांची गुंफण करून त्यांना उत्कृष्टरीत्या दागिन्यांच्या रूपात सादर करायचे होते. शुद्धता, प्रेम आणि उत्तम विचारांनी तयार केलेले सप्तम कलेक्शन हे एक भावनांचे मिश्रण आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ आणि आमच्या ग्राहकांसोबत दिवाळीचा आनंद प्रकाशमान करण्याचा प्रयत्न आहे.
सप्तम कलेक्शनसह ब्रॅंडने ईना कलेक्शनदेखील सादर केले आहे, जे खास दिवाळीसाठी तयार केलेले अनोखे डायमंड ज्वेलरी कलेक्शन आहे. दिवाळी सोन्याच्या दागिन्यांचा उत्सव मानला जातो; मात्र, हिऱ्यांची आवड असणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ब्रॅंडने हे कलेक्शन सादर केले आहे. या नैसर्गिक डायमंड ज्वेलरी कलेक्शनमधील डिझाईन्स ग्राहकांना नवीन आणि फॅशनेबल लूक प्रदान करते.पीएनजी ज्वेलर्सच्या ब्रॅंड ऍम्बेसिडर माधुरी दीक्षित नेने म्हणाल्या की, मला सप्तम कलेक्शन प्रचंड आवडले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून पीएनजी ज्वेलर्सतर्फे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 25 टक्क्यापर्यंत व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. ही दोन्ही कलेक्शन पीएनजी ज्वेलर्सच्या भारतभरातील सर्व 35 दालनांमध्ये उपलब्ध असतील.