पुणे -करोना प्रतिबंधक लसींची मागणी कमी झाल्याने पुण्यातील “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने लसीचे उत्पादन जानेवारीमध्ये थांबवले होते.
मात्र, आता 18 वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्याने या मोहिमेला आता “बुस्ट’ मिळण्याची शक्यता आहे. कंपनीकडे सध्या 200 दशलक्ष इतका कोविशील्डचा साठा आहे.
लाभार्थी पूर्णपणे कव्हर झाल्याने आता मागणीत घट झाली होती. त्यामुळे जानेवारीपासून त्याचे उत्पादन थांबवले होते. केंद्र सरकारने
गेल्या रविवारपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी बुस्टर’ डोस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, हा डोस सरकारी नव्हे खासगी लसीकरण केंद्रांवर स-शुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.