जवळा – जामखेड तालुक्यातील जवळा जवळील पुलाला कठडा व धोका असल्याचा सूचना फलक नसल्याने अनेक मोटरसायकल स्वार, चारचाकी गाड्या थेट ओढ्यात जात असल्याने अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अशाप्रकारे शनिवारी मोटरसायकल स्वाराचा अपघात होऊन एकणज जखमी झाला. जवळा येथील पुलावर नित्याचेच अपघात होत आहेत. जामखेड- करमाळा रोडवर असे बिगर कठड्याचे चार ते पाच पूल आहेत.
जामखेड – जवळा काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे. खडीकरण झाल्यावर रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर मोकळी खडी टाकलेली असल्याने वाहन चालकांचा वेग कंट्रोल करताना वाहन घसरून थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांवर आदळत असल्याने मोठे अपघात झाले आहेत. एकाच आठवड्यात चार ते पाच अपघात झाले आहेत. जामखेड जवळा रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच गतिरोधक असलेल्या ठिकाणी व वळण रस्त्यावर सूचनाफलक नसल्याने वाहन चालकांना धोक्याचा अंदाज येत नसल्याने दररोज अपघात होत आहेत. यामुळे जामखेड- जवळा रोड मृत्यूचा सापळा बनला आहे