मुंबई- सप्टेंबर महिना भारतातील शेअर बाजार निर्देशांकांसाठी कमालीचा नफादायक ठरला आहे. या महिन्यात आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा मुख्य निर्देशांक तीन टक्क्यांनी वाढला. त्या तुलनेमध्ये मिड कॅप 6.6 टक्क्यांनी तर मी स्मॉल कॅप 5.7 टक्क्यांनी वाढला आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये स्माल कॅपमधील 186 कंपन्यांच्या शेअरच्या किमती 10 त 119 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामध्ये डायमंड इन्फ्रास्ट्रक्चर. झेन टेक्नॉलॉजी, डिश टीव्ही, गोदरेज प्रॉपर्टीज, श्री अधिकारी ब्रदर्स टेलीविजन नेटवर्क, गुजरात अल्कलीज, नेल्को या कंपन्यांचा समावेश आहे.
मात्र या क्षेत्रातील 27 कंपन्यांच्या शेअरचे भाव 10 ते 27 टक्क्यांनी कमी झाले. त्यामध्ये व्हर्च्युअल ग्लोबल एज्युकेशन, यामिनी इन्व्हस्टमेंट, वालचंदनगर इंडस्ट्रीज, नंदन डेनिम, पंजाब केमिकल्स या कंपन्यांचा समावेश आहे.
सरलेल्या पुर्ण महिन्यात जरी निर्देशांकामध्ये भरघोस वाढ झाली असली तरी सरलेला आठवडा मात्र निर्देशांकाचा साठी निराशादायक ठरला. या आठवड्यात सेन्सेक्स 2.13 टक्क्यांनी म्हणजे 1282 अंकांनी तर निफ्टी 321 अंकांनी कमी झाला. सरलेल्या आठवड्यात मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये ही फारशी वाढ झालेली नाही.
सरलेल्या आठवड्यात जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारासह जागतिक शेअर बाजाराच्या निर्देशांकांचे नुकसान झाले. चीन आणि अमेरिकेतील काही नकारात्मक घडामोडींमुळे जागतिक शेअर बाजारात सरलेल्या आठवड्यात विक्रीचे वारे होते. आता आगामी काळात क्रुडच्या किमती कशा प्रकारे वाटचाल करतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. जर क्रुडच्या किमती वाढल्या तर शेअर बाजार निर्देशाकांवर दबाव कायम राहू शकतो असे बोलले जाते.