वाघोली (प्रतिनिधी) – वाडेबोल्हाई तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी योगेश नामदेव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच राजेंद्र शिंदे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सरपंच दीपक गावडे यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली. योगेश गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागली आहे.
यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रदीप शिंदे,गोपीनाथ भोरडे अन्य मान्यवरांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. योगेश गायकवाड यांच्या निवडीबद्दल माजी सरपंच कुशाबा गावडे, माजी उपसरपंच संजय भोरडे, राजेश वारघडे, विद्याधर गावडे, निळकंठ केसवड, शिवाजी भोरडे, चंद्रकांत केसवड, बळीराम गावडे, शहाजी शिंदे, पिलू चव्हाण, राजेंद्र इंगळे, सोपान गावडे आदींनी अभिनंदन केले आहे.