वाघोली – केसनंद (तालुका हवेली) येथील तळेरानवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी हनुमंत हरगुडे यांची निवड नुकतीच झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल वाघोलीचे माजी उपसरपंच तथा काँग्रेस आय पक्षाचे युवा नेते कैलास सातव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेस आय पक्षाचे नेते कैलास बापू सातव म्हणाले की, तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा वाटप तसेच इतर शेतीपूरक साहित्यांची मदत व्हावी यासाठी कामकाज केले जात असून हे कामकाज कौतुकास्पद आहे. यावेळी बोलताना हनुमंत हरगुडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडण्याचा प्रयत्न केला जाईल.