पुणे :- कासारसाई धरण 88 टक्के भरले आहे. पाण्याचा येवा (धरणात जमा होणारे पाणी) वाढत असल्याने आज(27 जुलै) दुपारी 2.00 वाजता धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नाला पात्रामध्ये 400 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तसेेच नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
त्याचवेळी, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सुरू असलेला 428 क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी 3.00 वाजता 856 क्यूसेक करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन देेेेखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.