मुंबई – ड्रामा क्वीन राखी सावंतला चर्चेत राहण्याची भारी हौस आहे. चर्चेत राहण्यासाठी अनेकदा ती कॅमेऱ्यासमोर काहींना काही हटके करताना दिसायची. राखी सध्या आपल्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीशी लग्न केल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. राखीने देखील याबाबत पोस्ट केली होती. परंतु सध्या राखीने आदिलसोबतचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणं बॅग्राऊंड टाकून पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये राखी आणि आदिल एक फोटोशूट करताना दिसत आहेत. या फोटोंसाठी राखी वेगवेगळ्या पोज देताना दिसते. काही क्लोज फोटो असताना राखी हळूच आदिलला किस करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
राखी काही दिवसांपूर्वीच बिग बॉसमध्ये दिसली होती. राखी आदिल यांच्यात अनेकदा भांडण देखील झाले होते. राखीने पोस्ट केलेल्या व्हिडीओचे नेटकरी कौतुक करत आहेत. ‘बोलीवूडमधील बेस्ट कपल होऊन दाखवा’ असे चॅलेंज एका युजरने कमेंट करून दोघांना दिले आहे. तर दुसऱ्या एकाने सैदव सोबत रहा अशी देखील कमेंट केली आह.
View this post on Instagram
राखीने केले होते फोटो शेअर
राखी सावंतनेतिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये आदिल आणि राखी सावंत साइन करताना दिसत होते. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राखी सावंतने लिहिले,’शेवटी, मी माझ्या प्रेमाशी लग्न करण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साहित आहे, आदिल माझे प्रेम तुझ्यासाठी बिनशर्त आहे.’