रणवीरने खरेदी केली नवी कार पहा फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंह आपल्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तसेच त्यांच्या फॅन्समध्येही तो खूपच पॉप्युलर आहे. आपल्या फॅन्सना तो अगदी सहजपणे भेटतही असतो. त्यांच्या याच अंदाजामुळे नेहमीच सामाजिक माध्यमांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु असते.

अलीकडेच, रणवीर पुन्हा एकदा डिजिटल माध्यमामध्ये चर्चेत आला आहे. मात्र यावेळी आपल्या उत्कृष्ट चित्रपट किंवा आगळ्या वेगळ्या फॅशनसाठी नव्हे तर त्यांनी खरेदी केलेल्या कारसाठी… रणवीरने तब्बल ३ करोडची ‘लंबोर्गिनी युरुस’ खरेदी केली आहे. गुरुवारी या गाडीमध्ये रणवीरला बघण्यात आले. सध्या त्यांचे या लाल गाडीतील फोटोला डिजिटल माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे.

तत्पूर्वी, “83′ च्या शुटिंगसाठी तो लंडनला गेला आहे. तिथल्या साऊथ हॉलमध्ये त्याच्या फॅन्सनी त्याला गराडा घातला. त्यावेळी त्याच्या फॅन्सनी अक्षरशः ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचे स्वागत केले. तो तिथे येणार आहे, अशी खबर मिळाल्यावर साऊथ हॉलमध्ये त्याचे फॅन्स आगोदरच एकत्र आले होते. रणवीरनेही सर्व फॅन्सशी शेकहॅन्ड केला आणि त्यांच्याबरोबर सेल्फीही काढले.

फॅन्सबरोबरच्या या भेटीचा व्हिडीओ एका फॅनने सोशल मिडीयावर अपलोड केला होता, या व्हिडीओमध्ये रणवीर एका वयस्कर लेडी फॅनबरोबर डान्स करताना दिसतो आहे. ही वयस्कर महिलाही रणवीरबरोबर मनापासून डान्स करते आहे. रणवीरच्या या सहज आणि मोकळ्या स्वभावाचे लोक खूप मनापासून कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, रणवीर सिंगने ‘रामलीला’, ‘पद्मावत’ ‘गली बॉय’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सिम्बा’ अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.