नारायणपूर – छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज चार नक्षलवाद्यांना स्फोटकांसह पकडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. इराकभट्टी खेड्यातील जंगलात या चौघांना आयईडी बॉम्ब आणि अन्य सामग्रीसह पकडण्यात आले आहे.
गेले दोन दिवस या भागात स्थानिक पोलीस व अन्य केंद्रीय सुरक्षा दलांच्या जवानांच्या वतीने संयुक्तपणे शोध मोहीम राबवण्यात येत होती. त्यावेळी हे नक्षलवादी जीवंतपणे पोलिसांच्या हाती लागले. हे नक्षलवादी माओवाद्यांच्या जनताना सरकार ग्रुपचे सदस्य आहेत.
गेल्या वर्षी इराकभट्टी-कोहकामेता रस्त्यावर झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटांमध्ये याच नक्षलवाद्यांचा हात होता. यातील तीन नक्षलवाद्यांना पकडून देण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. त्यांनी अनेक सरकारी विकासकामेही बंद पाडली होती.