देहूगाव, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्रे येलवाडी येथील नियोजित रिंगरोडलगत गट क्रमांक ३०० मधील १९ हेक्टर ३३ आर इतकी शासकीय गायरानातील जागा चाकण कृषी उपन्न बाजार समितीला देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी यांना ४ जानेवारी रोजी निर्देशपत्र दिले आहे. तसेच, या पत्राची एक प्रत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना देखील उपसचिव गजानन पाटील यांनी पाठविले आहे. आता याबाबत पुणे जिल्हाधिकारी कधी कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चाकण व परिसरातील वाढत्या शहरीकारणामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपबजार येथील जागा दिवसेंदिवस कमी पडत आहे. त्यामुळे चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा देण्याची मागणी येवलवाडी ग्रामपंचायतीकडे केली होती.तर अनेक रोजगार उपलब्ध होतील
चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येलवाडी येथे उपकृषी उत्पन्न बाजार समिती करण्यासाठी येथील गायरानातील जागेची मागणी केली होती. या गायरानातील जागा ही येलवाडी ग्रामपंचायतकडे देखभालीसाठी आहे. या ठिकाणी उपकृषी उत्पन्न बाजार समिती झाली तर या येलवाडी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तसेच, अनेक स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.