मुंबई – कंगना राणावत प्रेमात पडली आहे आणि एका इंटरव्ह्यूमध्ये तिने स्वतःच ही गोष्ट कबूल केली आहे. पुढील पाच वर्षांत विवाहबंधनात अडकलेली आणि दोन गोंडस मुलांची आई झालेली असेन, असे तिने स्वतःबद्दल बोलताना सांगितले.
नेहमी कोणाशी तरी पंगा घेणाऱ्या कंगनाला प्रेमात पडायला जमले कसे, असा प्रश्न तिच्या फॅन्सला पडू शकतो. पण स्वतः कंगनाच्या तोंडून हे ऐकल्यावर त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. कंगनाला अलीकडेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आपल्या भविष्यातील प्लॅनबद्दल बोलताना तिने हे सूतोवाच केले.
“मला विवाह करायचा आहे. मुलांची आईदेखील व्हायचे आहे. त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रात चांगले योगदानदेखील द्यायचे आहे,’ असे ती म्हणाली. मात्र, आपल्या भावी पार्टनरबद्दल तिने काहीही सांगितले नाही.
कदाचित पार्टनर कोण असावा याची फक्त तिने एक कल्पना निश्चित केली असावी. आगामी काळात कंगना “धाकड’मध्ये अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ताबरोबर लीड रोलमध्ये दिसणार आहे. याशिवाय “तेजस’मध्ये ती भारतीय हवाई दलातील लढाऊ पायलट म्हणून दिसणार आहे.