नारायणगाव -राज्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार असल्याने शैक्षणिक शुल्क वगळता अन्य कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये.
यासाठी आवश्यक ते आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्गमित करावेत, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांतील व्यवस्थापनाच्या वतीने 2020-21 वर्षाचे शुल्क आकारताना बस, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शुल्काचीही मागणी होत आहे. पालकांकडून तक्रारी आल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.