पावसामुळे मुंबईतील शाळा,कॉलेज बंद

“हाय अलर्ट’ असूनही बहुतेक भाग राहिला कोरडाच

मुंबई : मुंबईमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हवामान विभागाने मुंबईसाठी “हाय अलर्ट’जाहीर केला. तर राज्य सरकारने आज मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. नेहमीच पावसामुळे मुंबईची दैना होते. हा इतिहास लक्षात ठेवून मुंबईवासियांनी या पावसालाही तोंड देण्याची तयारी ठेवली होती.

हवामानशास्त्र विभागाने बुधवारी तांबड्या पावसाचा इशारा दिला होता. मुंबई व रायगड जिल्ह्यांत अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता असल्याचे म्हटले होते. हवामान विभागाने दिलेला “हाय अलर्ट’ म्हणजे विनोद वाटावा, अशी स्थिती दुपारपर्यंत होती. कारण दुपारपर्यंत मुंबईत पाऊस पडलाच नव्हता. बुधवारी संध्याकाळी आणि रात्री मुंबईच्या काही भागांमध्ये पाऊस पडला. तर गुरुवारी दुपारपर्यंत बहुतेक उर्वरित भाग चक्क कोरडाच राहिला. मात्र आज पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात आल्याने शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल रात्री आजच्या सुटीबाबतचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश अनेक शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे ही शाळा आणि महाविद्यालये सुरूच राहिली.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या अनियमित उष्णता आणि गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईवरी ढग धिक्‍ उंचीवर गेले, यावर्षीच्या पावसाळ्यात 1954 पासून सर्वात जास्त आर्द्र पाऊस नोंदला गेला आहे.
“यावर्षी मध्य प्रदेशात नियमितपणे काही काळानंतर पर्जन्यवृष्टी होत आहे, त्यामुळे मुंबई व आसपासच्या जिल्ह्यात एकूणच पाऊस वाढला आहे, असे हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

1 जूनपासून 17 सप्टेंबर पर्यंत मुंबईत 3,,467 मिमी पाऊस पडला आहे. 1954 मध्ये नोंदवलेल्या 3,4511 मिमी पेक्षाही यंदा जास्त पाऊस झाला आहे. या महिन्यातील आणखी 11 दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत मुंबई शहरात विक्रमी पावसाची नोंद होईल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)