अजय कुमार यांचा आपमध्ये प्रवेश

झारखंडमध्ये कॉंग्रेसला धक्का
नवी दिल्ली : झारखंड कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे झारखंडमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजयकुमार यांच्या पक्ष प्रवेशामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपला चांगला फायदा होईल असे बोलले जात आहे.

गुरुवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत झारखंड कॉंग्रसचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. अजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, राजकारणातील एका मोठ्या हस्तीने आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे आम आदमी पक्षामध्ये मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मनोज सिसोदिया यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.