SBI CBO Recruitment 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर्सची भरती सुरू केली आहे. बँकेने 1226 रिक्त पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून SBI वेबसाइटच्या करिअर सेक्शनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. पात्र उमेदवार SBI CBO भरतीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट – sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
– SBI CBO (Circle Based Officers) भरती 2021: महत्त्वाच्या तारखा
-CBOसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021
-ऑनलाईन फी भरण्याची तारीख – 9 ते 26 डिसेंबर 2021
-ऑनलाइन अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख- 13 जानेवारी 2022
-SBI CBO प्रवेशपत्र मिळण्याची तारीख- 12 जानेवारी 2022.
-SBI CBO परीक्षेची तारीख- नंतर जाहीर केली जाणार आहे.
– SBI CBO भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम https://ibpsonline.ibps.in/sbircbonov21/ वर जावे लागेल. त्यानंतर तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास प्रथम नोंदणी करावी लागेल. पुढे विचारलेली माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
– वय, पात्रता, वेतन
SBI CBO पदांसाठी “01.12.2021 रोजी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसलेल्यांनाच अर्ज करता येणार आहे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म 01.12.2000 च्या नंतर झालेला नसावा आणि 02.12.1991 पूर्वी झालेला नसावा. उमेदवार पदवीधर असावा. तसेच कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदांसाठी मूळ वेतन अंदाजे 36,000 रुपये आणि प्रत्येकवर्षी वेतनवाढ आहे. हे अधिकारी D.A, H.R.A/ लीज भाडे, C.C.A, वैद्यकीय आणि नियमांनुसार इतर भत्त्यांसाठी देखील पात्र असतील. दरम्यान, ही भरती लेखी परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखतीसह तीन टप्प्यांत केली जाईल. मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड होईल.