सतिश खंदारे यांची लडाखच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

नवी दिल्ली – कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. केंद्रशासित प्रदेश म्हणून गुरुवारपासून लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरले आहेत. ते ११९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

सतिश खंदारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला. २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, खारघरमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून खंदारे यांनी कार्यभार सांभाळला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.