पुसेगाव – प. पू. श्री. सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव येथे भरवण्यात येणाऱ्या यात्रेत भाविकांना वाटप करण्यात येणाऱ्या बुंदी महाप्रसाद तयार करण्याच्या भट्टीचे पूजन मठाधिपती प.पू सुंदरगिरी महाराज, खटावचे युवानेते राहूल पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रीती घार्गे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देवस्थान ट्स्टचे चेअरमन रणधीर जाधव , विश्वस्त डॉ . सूरेश जाधव , बाळासाहेब जाधव,संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी यात्रेच्या अकरा दिवसांच्या कालावधीत पुसेगावात येणाऱ्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्यावतीने मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यावर्षी २५ क्विंटल बेसन, ४० क्विंटल साखर व सुमारे २५० शुध्द तेलाचे डब्बे व इतर आवश्यक वस्तू यापासून बुंदीचा प्रसाद तयार करण्याच्या कामाला शुभारंभ झाला.
महाप्रसाद बनवण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत. परिसरातील नागरीक व ग्रामस्थ यांनी ही रोख रक्कम व वस्तू स्वरूपात अन्नदान निधी देवस्थान टस्टला दान देत आहेत. बऱ्याच सामान्य भाविक भक्तांची,नोकरदारांची,मोठमोठ्या व्यावसायिकांची,भांडवलंदारांची अन्नदानासाठी काहीतरी दान करावे अशी मनात इच्छा असते अशा भक्तांना अन्नदानासाठी मदत करावयाची असल्यास श्री सेवागिरी देवस्थान अन्नछत्र आणि सामाजिक मंडळ,पुसेगाव कराड अर्बन को ऑफ बँक लि. शाखा पुसेगाव अकाउंट नंबर (1014016000373), आयएफसीएस कोड ( KUCB0488014) किंवा देवस्थान ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन चेअरमन रणधीर जाधव यांनी केले आहे.