लोणंद – क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशन, हेल्प एज इंडिया व एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळ्यांच्या इतर आजारासंदर्भात अचूक निदान व उपचार शिबीर उत्साहात पार पडले. शिबिरास पाडेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.
शिबिरात रुग्णांची रक्तदाब व साखरेची पातळी चाचणी पाडेगाव आरोग्य उपकेंद्रातर्फे डॉ. समर्थ कस्सा व त्यांच्या टीम मार्फत करण्यात आली. शिबिराचे उदघाटन सरपंच राहुल कोकरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, युवा नेते नितीन जगताप, मानवाधिकार कार्यकर्ते प्रशांत अरविंद ढावरे, आबासाहेब मोरे, नरेश गायकवाड, चंद्रकांत गोरे, प्रभाकर नेवसे, बापूराव नेवसे, पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश बनकर व एच. व्ही. देसाई रुग्णालय नेत्र चिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थित होते.
शिबिरात ९४ रुग्णांची डोळे तपासणी करून काहींना नंबरचे चष्मे अल्पदरात देण्यात आले. तर पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशन मार्फत काही रुग्णांना औषधांचा पुरवठा करण्यात आला. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी १४ रुग्ण हे तत्काळ पुण्याला पाठवण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी महेश ढावरे, सनी रायकर, संदेश नेवसे, किरण गोरे, रोहित नेवसे, विशाल ढेकळे यांनी योगदान दिले.