म्हासुर्णे, (प्रतिनिधी) – म्हासुर्णे ता. खटाव.येथील श्री गोपीनाथ मसोबा देवाच्या यात्रेत आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात कंदर तालमीचा मल्ल पैलवान सतपाल सोनटके याने गंगावेज तालीम कोल्हापूर येथील पै. सागर तामखडे पैलावानाला एक लंगी व मानेवर कच चडवून टाकलेल्या डावावर चितपट केले. विजेता सतपाल सोनटक्के याला यात्रा कमिटीच्या वतीने एक लाख रुपयाचा इनाम देण्यात आला.
या मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे पै.पृथ्वीराज पाटील विरुध्द इचंलकरजी तालीम पै.अभिजित कनेरे यांची द्वितीय क्रमांकाची पंच्चाहत्तर रुपयाची कुस्ती घुटना या डावावर पैलवान पृथ्वीराज पाटीलने अभिजित कधेरेला चितपट करत जिंकली.
क्रांती कारखाना कुंडल पै.भारत पवार विरुध्द म्हस्वड तालमीचा पैलवान भैय्या देशमुख यांची तृतीय क्रमांकांची एक्कावन्न हजार रुपयांची कुस्ती पैलवान भारत पवार याने पोकळ घिस्सा डावावर भैय्या देशमुख पैलवानाला चितपट करत जिंकली.
सैदापुर तालीम पै. रणजित राजमाने विरुध्द कुरुर्डवाड सोलापुर तालमीचा पै. प्रमोद सुळ यांच्यात चतृर्थ क्रमांकाची एक्कावन्न हजार इनामाची कुस्ती झाली. पाय घिस्सा या डावावर पै. रणजित राजमाने याने पै. प्रमोद सुळ या पैलवानाला चितपट केले. कुस्ती मैदानात अनेक कुस्त्या काटा कुस्त्या झाल्या.
सर्व कुस्त्या श्री गोपीनाथ मसोबा यात्रा कमेठीने आखाडा तयार करुन भरवण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वाजता कुस्ती स्पर्धा सुरु झाल्या. या कुस्त्या रात्री ८.३० वाजेपर्यंत सुरु होत्या कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती. अनेक कुस्त्या डोळ्याची पापणी लावताच क्षणी पैलवानांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर डाव प्रतिडाव करत कुस्त्या जिंकल्या. अनेक लक्षवेधी लढती पाहताना तर कुस्ती शौकीनांचा श्वास रोखला होता.
कुस्तीचे पंच म्हणुन आण्णासो माने, तुषार माने, नदंकुमार माने, अर्जुन माने, अजित माने,विश्वास माने, हणमंत माने, युवराज माने, शंकर माने, बापुराव माने, लालासो गायकवाड यांनी पंच म्हणून काम पाहिले.
तर परशुराम पवार यांनी धावते समालोचन केले. कुस्ती मैदानाच्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चेअरमन रामचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, माजी चेअरमन आण्णासो माने, नंदकुमार, अर्जुन शिवाजी माने, विश्वास माने यांनी परिश्रम घेतले.