सातारा – मृत्यू आणि करोनारुग्णांच्या संख्येत घट आल्याने जिल्ह्याला आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात काल सोमवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 529 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असून दोन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
आजच्या या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 8 (9747 ), कराड 59 (37432), खंडाळा 19 (13708), खटाव 42 (23743), कोरेगाव 74 (20561), माण 50 (16448), महाबळेश्वर 3 (4566), पाटण 6 (9882), फलटण 115 (34011), सातारा 113 (48538), वाई 26 (15208) व इतर 14 (1852). आजअखेर बाधितांची एकूण संख्या दोन लाख 35 हजार 696 इतकी झाली आहे. आज फलटण तालुक्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे.
जावळी 0 (212), कराड 0 (1138), खंडाळा 0 (186), खटाव 0 (584), कोरेगाव 0 (446), माण 0 (370), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (357), फलटण 2 (656), सातारा 0 (1424), वाई 0 (356) व इतर 0 (76). आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5893 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.